PM Aawas Yojana List 2025: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर ; असे पहा यादीत नाव

प्रधानमंत्री आवास योजना यादी 2025 नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकार नागरिकांसाठी अनेक उपयोगी योजना आणत असते. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. या योजनेत सरकार पात्र नागरिकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देते. त्यामुळे अनेक गरीब आणि गरजू लोक आपले स्वतःचे घर बांधू शकतात.

जे नागरिक या योजनेसाठी पात्र ठरले आहेत, त्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे. ही यादी ऑनलाइन उपलब्ध असणार आहे. तुम्ही तुमचे नाव या यादीत आहे का, हे सहज पाहू शकता. जर तुमचे नाव यामध्ये असेल, तर तुम्ही तुमच्या नजीकच्या सीएससी सेंटर (CSC Center) मध्ये जाऊन आधार कार्ड आणि आवश्यक कागदपत्रांसह आपले व्हेरिफिकेशन पूर्ण करू शकता. एकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला घरकुलासाठी सरकारकडून पैसे मिळतील.

यादी कशी पहायची?

  1. दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  2. सर्वात आधी तुमचे राज्य निवडा.
  3. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
  4. कोणत्या वर्षाची यादी पाहायची आहे ते वर्ष निवडा.
  5. यादी उघडल्यावर प्रधानमंत्री आवास योजना या पर्यायावर क्लिक करा.
  6. खाली दिलेल्या कॅपच्या (Captcha) कोड टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  7. यानंतर तुमच्या गावाची संपूर्ण यादी दिसेल.

जर तुमचे नाव या यादीत असेल, तर तुम्ही पुढील प्रक्रिया करून घरासाठी मिळणारे पैसे घेऊ शकता. ही योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी मोठी मदत ठरत आहे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी पात्र असेल, तर त्यांनी नक्की यादीत नाव आहे का ते तपासावे!

Leave a Comment